Sunday, August 18, 2013

अवचित भेट

          आयुष्यात बरीच माणस भेटतात. त्यातली काही अगदी जिव्हाळ्याची होतात; मनाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी विसावतात. त्यांची संगत, मैत्री, प्रेम , द्वेष, त्यांच्या गप्पा , त्यांच्याशी share केलेलं सुख- दुख  कायम स्मरणात राहून जात. अशा व्यक्ती काही काळासाठीच सोबत असतात मग जसं आयुष्य पुढे सरकत जात तशा हळूहळू वाटा वेगळ्या होऊ लागतात. सुरुवातीला फार वाटत नेहमी संपर्कात राहू, अधेमधे भेटत जाऊ, कमीत कमी फोन करू… महिना दोन महिन्यातून एक फोन झाला तरी चालेल. आणि मग त्यांचा contact पूर्ण तुटून जातो. अस नाही कि आपल्याला त्यांची आठवण येत नाही किंवा त्यांना आपण आठवत नाही. कुणीच कुणाला विसरलेल नसतं पण जीवनातल्या priorities बदलेल्या असतात. प्रत्येक जण आपापल्या लोकांमधे व्यस्त होऊन जातो. आणि अशीच मग एक दिवस होते 'अवचित भेट'.

          लागोपाठच्या सुट्ट्या आल्याने बऱ्याच जणांनी office ला दांडी मारलेली आज. आणि जेवढे होते त्यांचापण कामाचा काही मुड न्हवता. कसातरी working hr.s चा हिशोब मांडायचा आणि लगेच घरी पाळायच. मिही सहा तास संपवून निघालो, शेवटी शेवटी आलेलं काम सोमवारवर ढकलून. सात दिवसांपासून एका मुलीची पत्रिका जुळते का ते बघायचं होत पण गुरूजींना काही वेळच मिळेना.  मुलीकडच्यांना अजुन काहीच कळंवळेल नाही आम्ही; सगळ पत्रिकेवर अडलेल आहे. गुरुजी तसे राहायला वारजे नाक्याला पण त्याचं घरी भेटण फार अवघड झालंय. गुरुजी दगडूशेठला पुजारी आहेत. त्यांनी मग तिथंच बोलावलं. माझा office ला जाणारा रस्ता दगडुशेठ मंदिराकडून जरी जात असला तरी मी मंदिरात कधी जात नाही. फार वाटल तर बाहेरूनच दर्शन घेतो आणि पुढे निघतो. आज मात्र देवाची ईच्छा म्हणून मंदिरात जाण झालं. देवाच्या समोरच पत्रिका बघणार असल्याने मी खूप आशावादी होतो. जुळली तर देवाच्या आशीर्वादाने आणि नाही जुळली तर देवाची ईच्छा, त्यामुळे जे होईल ते चांगलच होईल याबाबतीत मी निश्चिंत होतो.

          गुरुजींनी थोडावेळ थांबायला सांगितलं मला. म्हणुन मग मी गणपती समोरच्या आवारात बसलो. नेहमीप्रमाणे भक्तांची रांग होती. काही विशेष काम करत नव्हते गुरुजी, पण तरी वेळ देत न्हवते. इथं पथकात जाण्याची वेळ होत आली पण गुरुजी काही वेळ देईनात. हळुहळू mood off व्हायला सुरुवात झाली; संयम सुटू लागला. गुरुजींच लक्षच न्हवत माझ्याकडे. हळुहळू माझा राग भक्तांच्या रांगेवर येऊ लागला. तेवढ्यात एक ओळखीचा चेहरा ओझरता दिसला, लगेच मान आनंदाने पुन्हा मागे वळली. तो उदय होता, स्नेहाचा नवरा. त्याला मी फक्त एकदाच बघितलेलं, त्यांच्या लग्नात. आणि नंतर ना तो मला कधी दिसला, ना स्नेहा दिसली कधी. स्नेहा म्हणजे माझी लहान बहिण, इथं मला 'मानलेली' हा शब्द टाकण्याची अजिबात ईच्छा नाही. कारण ती मला नेहमी सख्खी बहीणच वाटलेली आहे. उदयला ओळखल्यावर नजर लगेच गरगरू लागली, स्नेहा कुठ दिसतेय का ते बघायला. आणि हळुच स्नेहा आवारात आली. नेहमी हसतमुख, प्रसन्न स्नेहा एकदम अशक्त दिसत होती; खूप थकल्यासारखी वाटत होती. वाटलं आजारी तर नाही पण आजारपणात एकदम दगडुशेठला! 

          स्नेहाचा खरंतर मला खुप राग आलेला होता. आमची शेवटची भेट झाली होती ती तिच्या लग्नात. नंतर मी बऱ्याच वेळा विचारूनही ती कधिच भेटली नाही, माझ्या बहिणीच्या लग्नालापण आली नाही. या गोष्टीचा मला जास्तच राग आलेला. त्यानंतर मी मग तिला contact केलाच नाही. तिला मी कधी भेटलोच नसतो जर दगडूशेठची ईच्छा नसती तर. इतक्या दिवसांनी म्हणजे तब्बल दोन वर्षांनी दिसली स्नेहा, तीपण अशी. मी हळुच हाक मारली, "स्नेहा"… बस तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. ती इतकी खुष झाली! माझी नजर हळूच बाजूला वळली, तिची सासू, नणंद आणि आईपण आलेल्या. त्यांच्या कुशीतलं ते गोंडस छोटंस बाळ पाहुन मला खूप आनंद झाला आणि मला समजायला उशीर लागला नाही. स्नेहा आई झालेली आत्ताच. सासुंना माझ्याबद्दल सांगू लागली,"मी सांगितलं होत ना, ज्याने मला लग्नात नथ दिली होती ना, तो हा…", व्वा!!! कायपण ओळख सांगितली एकदम स्नेहाstyle मध्ये. काकुंनि लगेच ओळखलं छान वाटलं "कसा आहेस, इकडे कसा, लग्नाचं काय, नक्की बोलव,… " वगैरे वगैरे छान विचारपूस केली काकुंनी. आणि दुसरीकडे स्नेहाचा प्रश्न, "कसा आहे तुझा ब्रुनो!!!", हसुच आलं मनात.  मी तर काकुंकडे तिची complaintच केली, भेटत नाही, काही नाही. फोन पण नाही.  नंतर मग उदय आल्यावर त्यांच्याशी बोललो. सगळ्यांशी छान गप्पा झाल्यावर मी मंदिरातून बाहेर पडलो. गुरुजींनी तर आज शक्य नाही अस सांगुन मला निराशाच केल. ज्यासाठी आलो होतो ते पत्रिकेच काम तर झालंच न्हवत शिवाय officeच काम अर्ध टाकलेलं, पथकाची practice बुडालेली.  पण त्यामुळे स्नेहाची झालेली भेट खरंच सुखावून गेली. प्रसन्न मनाने बाहेर आलो.  चप्पलstand जवळ एकदम आठवलं, आपण बाळाला काहीच दिल नाही. काहीतरी द्यायलाच हवं. मग तिथं पुन्हा मी पंधरा मिनिट त्यांची वाट बघत उभा राहिलो. आणि बाळाच्या हातात १०० रुपये देऊनच आलो. या अशा अवचित भेटी देव घडवून आणतो कारण त्यालाही वाटत असत कि या लोकांचा संपर्क कधी तुटू नये, यांनी कधी एकमेकांना विसरू नये आणि कदाचित आपलंच पुढे जाऊन काहीतरी भल होणार असेल. एक गोष्ट त्यादिवशी जाणवली, नाती जपण्यासाठी खूप आवश्यक असतात अशा या 'अवचित भेटी' ज्यात तुमच्या कडू आठवणी नसतात ना तुमचा अहंकार तुम्हाला रोखत.  


Wednesday, July 10, 2013

माझे चित्रांगन


      केट विन्सलेट 



       मदर तेरेसा



    अमृता - My Friend 



      Lord of Nature



      राणी मुखर्जी 



      स्वातंत्र्यवीर सावरकर 



Saturday, July 6, 2013

ब्रुनो

          ब्रुनो, आमच्या घरातलं नेहमी चर्चेत असणार नाव. सकाळची झोप उघडताच, "ब्रुनो, तिकडे जा , इकडे नको येउस… ", "ब्रुनो, मी बाहेर जाऊन येते, मागे नको येउस ", "कल्पेश ब्रुनो ला बोलाव तिकडे… " असे आवाज कानी पडायला लागतात. आपण अंथरुणातून उठताच, तो आपल्या जवळ येउन "गुड मॉर्निंग" विश करतो. पण त्याची style जरा वेगळी आहे; शेपटी हलवत जवळ यायचं आणि आपल्या हाताला चाटायच ; हि  त्याची style.

          ब्रुनो, आमच्या घरातलं छोटस कुत्र्याचं पिल्लु, खर म्हटलं तर आमच्या घरातला महत्वाचा माणूस. जातीने Cocker-Spaniel, कुत्र्यांची लहान ब्रीड. अगांवर मऊ, लुसलुशीत golden-brown केसं, उंचीने आपल्या गुडघ्या एवढा आणि दोन पायांवर उभा राहिला तर कमरेपर्यंत येतो. चेहरयावर brown Velvet असावा असे छोटे छोटे केस आणि त्याचं वैशिष्ठ म्हणजे त्याचे खाली लोमकलनारे लांब लांब कान. त्याचे कान आणि डोक्यावरचे केस त्याला step cut चा look देतात. त्याचे golden-brown केस उन्हात तर फारच सुंदर  चकाकतात. डोक्यावर आणि पायांवर पुर्ण golden आणि पाठीवर brown. केसांच्या या सुंदर झुपक्यात छानसे काळे पाणीदार डोळे. ब्रुनोच्या अशा personalityमुळे (माफ करा प्राण्यांसाठी personality ला पर्यायी शब्द माहित नाही ) कुणीही त्याच्या लगेच प्रेमात पडतं. 

          त्याला सकाळी फिरायला नेतो तेव्हा तर पूर्ण गल्ली त्याच्याकडे पहात असते. रस्त्यावरून जाणारे कुणी आई-बाबा किंवा आजोबा त्यांच्या बाळाला दाखवतात,"बघ बघ, कित्ती छान doggy आहे, किती cute आहे ना…". काही जण तर त्यांच्या mobile मध्ये फोटो पण काढतात ब्रुनोचा. ब्रुनोपण त्यांच्या जवळ जातो, त्यांचा वास घेऊन त्यांची ओळख करून घेतो आणि डुग-डुग करत पुढे चालायला लागतो; एकदम सेलेब्रिटी असल्याच्या ऐटीत . रस्त्यावर कुणी दुसरा कुत्रा दिसला तर मग याच्यातला कुत्रा जागी होतो आणि मग "हि गल्ली माझी आहे" अस सांगण्यासाठी याच भुंकण सुरु होत. मुर्ती लहान जरी असली तरी त्याच मान वर करून सिंहाच्या अविर्भावात गुरगुरण कोणत्याही कुत्र्याला धडकी भरवत. हातातली दोरीसुद्धा तो खूप ताकदीने खेचतो. अशावेळी त्याला आवरता आवरता हातावर दोरीचे व्रण उमटतात. 

           फक्त बावीस दिवसांचा होता ब्रुनो जेव्हा आणला तेव्हा. घरात कुणालाच कुत्रा नको होता पण मी कुणालाही न कळवता जबरदस्तीनेच आणला. कुत्रा बघितल्यावर घरच्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या पण फक्त दोन मिनिटांसाठी. जस मी ब्रुनोला खाली ठेवलं तशी त्याने धावपळ सुरु केली. आणि त्याच क्षणी ब्रुनोने सगळ्यांना जिंकल. नंतर काही दिवसातच तो सगळ्यांचा लाडका झाला. फक्त घरातच नाही तर पूर्ण society, गल्ली, जिथ जाईल तिथ ब्रुनो famous झाला. बरेच लोक आम्हाला तर ब्रुनोचे मालक म्हणूनच ओळखतात. एकदा तर मी "तो ब्रुनो नावाचा कुत्रा माझा आहे अस सांगून दुकानदाराकडून उधार घेतलं होत". 
 
           ऑफिस मधले तान-तणाव आटोपून आपण घरी येतो आणि दार उघडताच ब्रुनो स्वागताला हजर. आधी दारातच तो तुम्हाला त्याचा bale dance दाखवेल, तुमच्या हाताचा वास घेईल, bag मध्ये काही असेल तर bag check करेल.  मग तो तुम्हाला चप्पल stand दाखवेल. तुम्हाला बेडरूम पर्यंत नेईल. घरातला प्रत्येक माणूस दारातून आत आल्यावर कुठ कुठ जातो हे सगळ त्याच्या लक्षात आहे. त्यामुळे बरोबर timing साधत तो आपल्या पुढे पुढे चालतो. आणि मधे मधे आपण त्याच्या मागेच आहोत ना याची खात्री करत असतो. त्याचा असा हा स्वागत समारंभ, आपण जेव्हा त्याला प्रेमाने कुरवाळतो तेव्हाच संपतो. आपण घरी गेल्यावर कुणालाच एवढा आनंद होत नसेल जेवढा या मुक्या प्राण्याला होतो.

          केव्हाही कुठूनही आवाज द्या लगेच शेपटी हलवत ब्रुनो हजर. आणि मग तुम्ही त्याच्याशी कितीही वेळ खेळू शकता. लहान मुलं जशी असतात तसाच ब्रुनोपण. त्याला सतत काही ना काही खेळायला हवं असतं. काही नसेल तर मग तो खाली नेण्यासाठी आईच्या मागे लागतो. आपण काही वस्तू ब्रुनोला दाखवून वर पकडली कि ते आव्हान समजून तो दोन पायांवर उभा राहतो. मग तुम्ही जर हात अजुन थोडा वर केलात तरी तो हार न मानता उड्या मारून ती वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतो. माझा भाऊ मग त्याच्याकडून अशाप्रकारे dance करवून घेतो. हाताच्या हालचालींवर ब्रुनोचा dance पाहण्यासारखा असतो. आणि एकदा का ती वस्तू त्याला सापडली कि मग तो आतल्या खोलीत पळ काढतो आणि एका जागी बसून तिला चावत राहतो. ती वस्तू त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला तर तो गुरगुरतो आणि त्याची पकड अजून घट्ट करतो. केव्हातरी तुम्ही शांतपणे galleryत उभे राहून बाहेर तर ब्रुनो हि बाजूला उभा राहून तुम्हाला कंपनी देईल. मग galleryत जर कबुत्तर आलं तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करेल. त्याला कधी त्यात यश नाही आलं पण तो प्रयत्न सोडत नाही, मग ते galleryतल कबुत्तर असो कि बेड खाली गेलेली त्याची कॅल्शियमची काडी. 

          घरातल्या सगळ्यांना ओळखतो तो, अगदी नावानिशी. त्याला आपली भाषापण समजते, फक्त बोलता नाही येत. एरवी आईला तो कुठही जाऊ देत नाही, खूप मागे लागतो, भुंकतो, पण संध्याकाळी आई जेव्हा "मंदिरातून येते " असं सांगते तेव्हा मात्र तो अजिबात मागे लागत नाही. बोलता येत नसल तरी खाना-खुणा करून तो त्याच्या भावना आमच्यापर्यंत पोचवतो. त्याच्या हुशारीच कौतुक करावं ते थोडंच. 

          माझ्या बहिणीच्या लग्नात बिचाऱ्याला मंडपाच्या एका खांबाला बांधून ठेवलं होत. आधी खूप भुंकला पण आमचा नाईलाज असल्याने आम्ही त्याला मोकळ सोडलं नाही. सगळे समोर असतांना त्याला मात्र एकट्याला राहावं लागतंय या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटलं होत. त्याने त्या दीवशी काहीच खाल्लं नाही. त्याचा चेहरा अगदी कोमेजून गेला होता. सगऴ आटोपल्यावर आम्ही जेव्हा त्याला सोडलं तेव्हा त्याच्या तोंडातून आवाजही निघत न्हवता. हाताला चाटत चाटत आणि मान खाली वर करत तो त्याची नाराजी व्यक्त करत होता आणि त्याच वेळी त्याची छोटीशी शेपटी हलवुन, त्याला सोडल्याबद्दल तो धन्यवाद म्हणत होता. या गोष्टीच आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि म्हणुनच त्यानंतर आम्ही ब्रुनोला कधीच एकट सोडलं नाही. त्याच्या बरोबर नेहमी कुणीतरी घरी असत. कुत्रा हा फक्त इमानदार नाही तर देवाने बनवलेला सगळ्यांत उत्तम प्राणी आहे, याचं यथायोग्य उदाहरण म्हणजे आमचा ब्रुनो. 



Friday, June 28, 2013

आसमंत माझा

मित्रान्नो ,

माझ्या  ब्लॉग पर्यंत पोचण्यासाठी , तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद . मी ना चांगला लेखक ना चांगला वाचक पण कधी कधी इतकं छान छान सुचायला लागतं की ते कागदावर उतरवल्याशिवाय चैनच पडत नाही . आधी डायरी लिहित होतो तेव्हा सगळ त्यात उतरवत असे. कधी कधी तर रात्रभर लिहित बसे . मला अजून पण आठवत , C-DAC ला असतांना , रात्री एक वाजता लिहायला बसलो , इतकं काही  सुचत होत की  पहाटेचे  ५:३० वाजून गेले तरी समजल नाही. शेवटी पक्षांच्या किलबिलाटाने शुध्दीवर आणलं. 

डायरीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मनातिल चांगली-वाईट प्रत्येक गोष्ट तुम्ही express करू शकता आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला ती secret ठेवावी लागते. मनातल्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोचवण्याच त्याला पार्यायी माध्यम म्हणजे BLOG. 

मी कधी स्वताचा ब्लॉग लिहील असं वाटलं न्हवत. उलट कशाला हा time pass, कोण वाचणार आपले ब्लॉग म्हणून ब्लॉग लिहिण्याच्या विरुद्धच होतो. मला inspire केल ते एका मुलीने . लग्नासाठी मुलगी शोधता-शोधता मला तिचा ब्लॉग वाचायला मिळाला. उत्सुकता म्हणून सहज एक वाचला छान वाटला म्हणून दुसरा वाचला तो तर पहिल्यापेक्षा चांगला वाटला. अस करत करत सगळे वाचले. जेवढ चेहऱ्याने impress केल नाही त्यापेक्षा जास्त ब्लॉग ने केलं. खूप साधं लिखाण होत पण एक -एक शब्द आपल्या मनातला वाटला . त्यावर वाचकांनच्या  comments मग पुन्हा त्यावर reply , सगळच भारी होत. 

मनाच्या या खुल्या आसमंतात स्वछंदपणे भरारी घेणारा हा ब्लॉग ..... आसमंत माझा