शिवबाचे
सैनिक सारे, वेध आम्हाला गणरायाचे।
जिंकुन
जाऊ रणांगन, घेउन आयुध ढोल-ताशांचे॥
ढम-ढम
आमच्या ढोलांची अन तड-तड आमच्या ताशांची।
धरनिचेही
पाय थिरकतिल, ऐकुन गर्जना वाद्यांची॥
भास
घडवू रेल्वेचा अन वाजेल असा एक-ठोका।
गगानालाही
धाक दाखवू, पाउस पाडू एवढा॥
रॉकही
बडवू आम्ही, बरसात सोळ थाप्यांची।
भुलुन
जाइल दुनिया सारी, साथ मिळेल जेव्हा गरब्याची॥
कसब
जाणिले पाच हातांचे, त्याला चपातिचि तलवार।
जोशिल्या
भिमरुपिला चढेल शिवाघोषाची धार॥
बळ
मिळाले अश्वांचे अन चढविले कातडे वाघांचे।
दुमदुमुन
जाइल आसमंत जेव्हा स्फ़ुरतिल बाहू सिंहांचे॥
आशीष
भवानीचा आम्हाला, गाजवू मनांवर अधिराज्य।
होईल
जयघोष एकच, शिवसाम्राज्य-शिवसाम्राज्य||
No comments:
Post a Comment