Sunday, August 18, 2013

अवचित भेट

          आयुष्यात बरीच माणस भेटतात. त्यातली काही अगदी जिव्हाळ्याची होतात; मनाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी विसावतात. त्यांची संगत, मैत्री, प्रेम , द्वेष, त्यांच्या गप्पा , त्यांच्याशी share केलेलं सुख- दुख  कायम स्मरणात राहून जात. अशा व्यक्ती काही काळासाठीच सोबत असतात मग जसं आयुष्य पुढे सरकत जात तशा हळूहळू वाटा वेगळ्या होऊ लागतात. सुरुवातीला फार वाटत नेहमी संपर्कात राहू, अधेमधे भेटत जाऊ, कमीत कमी फोन करू… महिना दोन महिन्यातून एक फोन झाला तरी चालेल. आणि मग त्यांचा contact पूर्ण तुटून जातो. अस नाही कि आपल्याला त्यांची आठवण येत नाही किंवा त्यांना आपण आठवत नाही. कुणीच कुणाला विसरलेल नसतं पण जीवनातल्या priorities बदलेल्या असतात. प्रत्येक जण आपापल्या लोकांमधे व्यस्त होऊन जातो. आणि अशीच मग एक दिवस होते 'अवचित भेट'.

          लागोपाठच्या सुट्ट्या आल्याने बऱ्याच जणांनी office ला दांडी मारलेली आज. आणि जेवढे होते त्यांचापण कामाचा काही मुड न्हवता. कसातरी working hr.s चा हिशोब मांडायचा आणि लगेच घरी पाळायच. मिही सहा तास संपवून निघालो, शेवटी शेवटी आलेलं काम सोमवारवर ढकलून. सात दिवसांपासून एका मुलीची पत्रिका जुळते का ते बघायचं होत पण गुरूजींना काही वेळच मिळेना.  मुलीकडच्यांना अजुन काहीच कळंवळेल नाही आम्ही; सगळ पत्रिकेवर अडलेल आहे. गुरुजी तसे राहायला वारजे नाक्याला पण त्याचं घरी भेटण फार अवघड झालंय. गुरुजी दगडूशेठला पुजारी आहेत. त्यांनी मग तिथंच बोलावलं. माझा office ला जाणारा रस्ता दगडुशेठ मंदिराकडून जरी जात असला तरी मी मंदिरात कधी जात नाही. फार वाटल तर बाहेरूनच दर्शन घेतो आणि पुढे निघतो. आज मात्र देवाची ईच्छा म्हणून मंदिरात जाण झालं. देवाच्या समोरच पत्रिका बघणार असल्याने मी खूप आशावादी होतो. जुळली तर देवाच्या आशीर्वादाने आणि नाही जुळली तर देवाची ईच्छा, त्यामुळे जे होईल ते चांगलच होईल याबाबतीत मी निश्चिंत होतो.

          गुरुजींनी थोडावेळ थांबायला सांगितलं मला. म्हणुन मग मी गणपती समोरच्या आवारात बसलो. नेहमीप्रमाणे भक्तांची रांग होती. काही विशेष काम करत नव्हते गुरुजी, पण तरी वेळ देत न्हवते. इथं पथकात जाण्याची वेळ होत आली पण गुरुजी काही वेळ देईनात. हळुहळू mood off व्हायला सुरुवात झाली; संयम सुटू लागला. गुरुजींच लक्षच न्हवत माझ्याकडे. हळुहळू माझा राग भक्तांच्या रांगेवर येऊ लागला. तेवढ्यात एक ओळखीचा चेहरा ओझरता दिसला, लगेच मान आनंदाने पुन्हा मागे वळली. तो उदय होता, स्नेहाचा नवरा. त्याला मी फक्त एकदाच बघितलेलं, त्यांच्या लग्नात. आणि नंतर ना तो मला कधी दिसला, ना स्नेहा दिसली कधी. स्नेहा म्हणजे माझी लहान बहिण, इथं मला 'मानलेली' हा शब्द टाकण्याची अजिबात ईच्छा नाही. कारण ती मला नेहमी सख्खी बहीणच वाटलेली आहे. उदयला ओळखल्यावर नजर लगेच गरगरू लागली, स्नेहा कुठ दिसतेय का ते बघायला. आणि हळुच स्नेहा आवारात आली. नेहमी हसतमुख, प्रसन्न स्नेहा एकदम अशक्त दिसत होती; खूप थकल्यासारखी वाटत होती. वाटलं आजारी तर नाही पण आजारपणात एकदम दगडुशेठला! 

          स्नेहाचा खरंतर मला खुप राग आलेला होता. आमची शेवटची भेट झाली होती ती तिच्या लग्नात. नंतर मी बऱ्याच वेळा विचारूनही ती कधिच भेटली नाही, माझ्या बहिणीच्या लग्नालापण आली नाही. या गोष्टीचा मला जास्तच राग आलेला. त्यानंतर मी मग तिला contact केलाच नाही. तिला मी कधी भेटलोच नसतो जर दगडूशेठची ईच्छा नसती तर. इतक्या दिवसांनी म्हणजे तब्बल दोन वर्षांनी दिसली स्नेहा, तीपण अशी. मी हळुच हाक मारली, "स्नेहा"… बस तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. ती इतकी खुष झाली! माझी नजर हळूच बाजूला वळली, तिची सासू, नणंद आणि आईपण आलेल्या. त्यांच्या कुशीतलं ते गोंडस छोटंस बाळ पाहुन मला खूप आनंद झाला आणि मला समजायला उशीर लागला नाही. स्नेहा आई झालेली आत्ताच. सासुंना माझ्याबद्दल सांगू लागली,"मी सांगितलं होत ना, ज्याने मला लग्नात नथ दिली होती ना, तो हा…", व्वा!!! कायपण ओळख सांगितली एकदम स्नेहाstyle मध्ये. काकुंनि लगेच ओळखलं छान वाटलं "कसा आहेस, इकडे कसा, लग्नाचं काय, नक्की बोलव,… " वगैरे वगैरे छान विचारपूस केली काकुंनी. आणि दुसरीकडे स्नेहाचा प्रश्न, "कसा आहे तुझा ब्रुनो!!!", हसुच आलं मनात.  मी तर काकुंकडे तिची complaintच केली, भेटत नाही, काही नाही. फोन पण नाही.  नंतर मग उदय आल्यावर त्यांच्याशी बोललो. सगळ्यांशी छान गप्पा झाल्यावर मी मंदिरातून बाहेर पडलो. गुरुजींनी तर आज शक्य नाही अस सांगुन मला निराशाच केल. ज्यासाठी आलो होतो ते पत्रिकेच काम तर झालंच न्हवत शिवाय officeच काम अर्ध टाकलेलं, पथकाची practice बुडालेली.  पण त्यामुळे स्नेहाची झालेली भेट खरंच सुखावून गेली. प्रसन्न मनाने बाहेर आलो.  चप्पलstand जवळ एकदम आठवलं, आपण बाळाला काहीच दिल नाही. काहीतरी द्यायलाच हवं. मग तिथं पुन्हा मी पंधरा मिनिट त्यांची वाट बघत उभा राहिलो. आणि बाळाच्या हातात १०० रुपये देऊनच आलो. या अशा अवचित भेटी देव घडवून आणतो कारण त्यालाही वाटत असत कि या लोकांचा संपर्क कधी तुटू नये, यांनी कधी एकमेकांना विसरू नये आणि कदाचित आपलंच पुढे जाऊन काहीतरी भल होणार असेल. एक गोष्ट त्यादिवशी जाणवली, नाती जपण्यासाठी खूप आवश्यक असतात अशा या 'अवचित भेटी' ज्यात तुमच्या कडू आठवणी नसतात ना तुमचा अहंकार तुम्हाला रोखत.