Wednesday, July 10, 2013

माझे चित्रांगन


      केट विन्सलेट 



       मदर तेरेसा



    अमृता - My Friend 



      Lord of Nature



      राणी मुखर्जी 



      स्वातंत्र्यवीर सावरकर 



Saturday, July 6, 2013

ब्रुनो

          ब्रुनो, आमच्या घरातलं नेहमी चर्चेत असणार नाव. सकाळची झोप उघडताच, "ब्रुनो, तिकडे जा , इकडे नको येउस… ", "ब्रुनो, मी बाहेर जाऊन येते, मागे नको येउस ", "कल्पेश ब्रुनो ला बोलाव तिकडे… " असे आवाज कानी पडायला लागतात. आपण अंथरुणातून उठताच, तो आपल्या जवळ येउन "गुड मॉर्निंग" विश करतो. पण त्याची style जरा वेगळी आहे; शेपटी हलवत जवळ यायचं आणि आपल्या हाताला चाटायच ; हि  त्याची style.

          ब्रुनो, आमच्या घरातलं छोटस कुत्र्याचं पिल्लु, खर म्हटलं तर आमच्या घरातला महत्वाचा माणूस. जातीने Cocker-Spaniel, कुत्र्यांची लहान ब्रीड. अगांवर मऊ, लुसलुशीत golden-brown केसं, उंचीने आपल्या गुडघ्या एवढा आणि दोन पायांवर उभा राहिला तर कमरेपर्यंत येतो. चेहरयावर brown Velvet असावा असे छोटे छोटे केस आणि त्याचं वैशिष्ठ म्हणजे त्याचे खाली लोमकलनारे लांब लांब कान. त्याचे कान आणि डोक्यावरचे केस त्याला step cut चा look देतात. त्याचे golden-brown केस उन्हात तर फारच सुंदर  चकाकतात. डोक्यावर आणि पायांवर पुर्ण golden आणि पाठीवर brown. केसांच्या या सुंदर झुपक्यात छानसे काळे पाणीदार डोळे. ब्रुनोच्या अशा personalityमुळे (माफ करा प्राण्यांसाठी personality ला पर्यायी शब्द माहित नाही ) कुणीही त्याच्या लगेच प्रेमात पडतं. 

          त्याला सकाळी फिरायला नेतो तेव्हा तर पूर्ण गल्ली त्याच्याकडे पहात असते. रस्त्यावरून जाणारे कुणी आई-बाबा किंवा आजोबा त्यांच्या बाळाला दाखवतात,"बघ बघ, कित्ती छान doggy आहे, किती cute आहे ना…". काही जण तर त्यांच्या mobile मध्ये फोटो पण काढतात ब्रुनोचा. ब्रुनोपण त्यांच्या जवळ जातो, त्यांचा वास घेऊन त्यांची ओळख करून घेतो आणि डुग-डुग करत पुढे चालायला लागतो; एकदम सेलेब्रिटी असल्याच्या ऐटीत . रस्त्यावर कुणी दुसरा कुत्रा दिसला तर मग याच्यातला कुत्रा जागी होतो आणि मग "हि गल्ली माझी आहे" अस सांगण्यासाठी याच भुंकण सुरु होत. मुर्ती लहान जरी असली तरी त्याच मान वर करून सिंहाच्या अविर्भावात गुरगुरण कोणत्याही कुत्र्याला धडकी भरवत. हातातली दोरीसुद्धा तो खूप ताकदीने खेचतो. अशावेळी त्याला आवरता आवरता हातावर दोरीचे व्रण उमटतात. 

           फक्त बावीस दिवसांचा होता ब्रुनो जेव्हा आणला तेव्हा. घरात कुणालाच कुत्रा नको होता पण मी कुणालाही न कळवता जबरदस्तीनेच आणला. कुत्रा बघितल्यावर घरच्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या पण फक्त दोन मिनिटांसाठी. जस मी ब्रुनोला खाली ठेवलं तशी त्याने धावपळ सुरु केली. आणि त्याच क्षणी ब्रुनोने सगळ्यांना जिंकल. नंतर काही दिवसातच तो सगळ्यांचा लाडका झाला. फक्त घरातच नाही तर पूर्ण society, गल्ली, जिथ जाईल तिथ ब्रुनो famous झाला. बरेच लोक आम्हाला तर ब्रुनोचे मालक म्हणूनच ओळखतात. एकदा तर मी "तो ब्रुनो नावाचा कुत्रा माझा आहे अस सांगून दुकानदाराकडून उधार घेतलं होत". 
 
           ऑफिस मधले तान-तणाव आटोपून आपण घरी येतो आणि दार उघडताच ब्रुनो स्वागताला हजर. आधी दारातच तो तुम्हाला त्याचा bale dance दाखवेल, तुमच्या हाताचा वास घेईल, bag मध्ये काही असेल तर bag check करेल.  मग तो तुम्हाला चप्पल stand दाखवेल. तुम्हाला बेडरूम पर्यंत नेईल. घरातला प्रत्येक माणूस दारातून आत आल्यावर कुठ कुठ जातो हे सगळ त्याच्या लक्षात आहे. त्यामुळे बरोबर timing साधत तो आपल्या पुढे पुढे चालतो. आणि मधे मधे आपण त्याच्या मागेच आहोत ना याची खात्री करत असतो. त्याचा असा हा स्वागत समारंभ, आपण जेव्हा त्याला प्रेमाने कुरवाळतो तेव्हाच संपतो. आपण घरी गेल्यावर कुणालाच एवढा आनंद होत नसेल जेवढा या मुक्या प्राण्याला होतो.

          केव्हाही कुठूनही आवाज द्या लगेच शेपटी हलवत ब्रुनो हजर. आणि मग तुम्ही त्याच्याशी कितीही वेळ खेळू शकता. लहान मुलं जशी असतात तसाच ब्रुनोपण. त्याला सतत काही ना काही खेळायला हवं असतं. काही नसेल तर मग तो खाली नेण्यासाठी आईच्या मागे लागतो. आपण काही वस्तू ब्रुनोला दाखवून वर पकडली कि ते आव्हान समजून तो दोन पायांवर उभा राहतो. मग तुम्ही जर हात अजुन थोडा वर केलात तरी तो हार न मानता उड्या मारून ती वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतो. माझा भाऊ मग त्याच्याकडून अशाप्रकारे dance करवून घेतो. हाताच्या हालचालींवर ब्रुनोचा dance पाहण्यासारखा असतो. आणि एकदा का ती वस्तू त्याला सापडली कि मग तो आतल्या खोलीत पळ काढतो आणि एका जागी बसून तिला चावत राहतो. ती वस्तू त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला तर तो गुरगुरतो आणि त्याची पकड अजून घट्ट करतो. केव्हातरी तुम्ही शांतपणे galleryत उभे राहून बाहेर तर ब्रुनो हि बाजूला उभा राहून तुम्हाला कंपनी देईल. मग galleryत जर कबुत्तर आलं तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करेल. त्याला कधी त्यात यश नाही आलं पण तो प्रयत्न सोडत नाही, मग ते galleryतल कबुत्तर असो कि बेड खाली गेलेली त्याची कॅल्शियमची काडी. 

          घरातल्या सगळ्यांना ओळखतो तो, अगदी नावानिशी. त्याला आपली भाषापण समजते, फक्त बोलता नाही येत. एरवी आईला तो कुठही जाऊ देत नाही, खूप मागे लागतो, भुंकतो, पण संध्याकाळी आई जेव्हा "मंदिरातून येते " असं सांगते तेव्हा मात्र तो अजिबात मागे लागत नाही. बोलता येत नसल तरी खाना-खुणा करून तो त्याच्या भावना आमच्यापर्यंत पोचवतो. त्याच्या हुशारीच कौतुक करावं ते थोडंच. 

          माझ्या बहिणीच्या लग्नात बिचाऱ्याला मंडपाच्या एका खांबाला बांधून ठेवलं होत. आधी खूप भुंकला पण आमचा नाईलाज असल्याने आम्ही त्याला मोकळ सोडलं नाही. सगळे समोर असतांना त्याला मात्र एकट्याला राहावं लागतंय या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटलं होत. त्याने त्या दीवशी काहीच खाल्लं नाही. त्याचा चेहरा अगदी कोमेजून गेला होता. सगऴ आटोपल्यावर आम्ही जेव्हा त्याला सोडलं तेव्हा त्याच्या तोंडातून आवाजही निघत न्हवता. हाताला चाटत चाटत आणि मान खाली वर करत तो त्याची नाराजी व्यक्त करत होता आणि त्याच वेळी त्याची छोटीशी शेपटी हलवुन, त्याला सोडल्याबद्दल तो धन्यवाद म्हणत होता. या गोष्टीच आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि म्हणुनच त्यानंतर आम्ही ब्रुनोला कधीच एकट सोडलं नाही. त्याच्या बरोबर नेहमी कुणीतरी घरी असत. कुत्रा हा फक्त इमानदार नाही तर देवाने बनवलेला सगळ्यांत उत्तम प्राणी आहे, याचं यथायोग्य उदाहरण म्हणजे आमचा ब्रुनो.